पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावी परीक्षेचे डेटशीट जाहीर केले आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहेत. दरम्यान ‘सीबीएसई’ने बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर गणित विषयाची नमूना प्रश्नपत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गणिताचा पेपर एकूण ५ विभागात विभागलेला आहे. यामध्ये एकूण ३८ प्रश्न विचारले जाणार आहेत. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार गणिताचा संभाव्य पेपर तपशील पुढीलप्रमाणे असेल…
विभाग (अ): सीबीएसई बोर्डाची दहावी गणिताची परीक्षा एकूण ८० गुणांसाठी घेतली जाणार आहे. पहिल्या विभागात एकण २० बहूपर्यायी प्रश्न
असतील. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण दिलेला आहे. म्हणजेच या विभागाला एकूण २० आहेत.
विभाग (ब): गणिताच्या पेपरमधील दुसरा विभाग लघु उत्तरांच्या प्रश्नांचा असेल. यात एकूण ५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण विहित केलेले आहेत. हा विभाग एकूण १० गुणांसाठी असेल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ३० ते ५० शब्दांमध्ये द्यावे लागेल.
विभाग (क): तिसऱ्या विभागात ६ छोटे प्रश्न असतील. यात प्रत्येक प्रश्नासाठी तीन गुण निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात, संपूर्ण विभाग एकूण १८ गुणांसाठी असेल. या विभागातील प्रश्नांची उत्तरे ५० ते ८० शब्दांत लिहावी लागतील.
विभाग (ड): सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या गणित परीक्षेतील चौथ्या विभागात ४ सविस्तर उत्तरांचे प्रश्न असतील. यात प्रत्येक प्रश्नासाठी १५ गुण विहित केलेले आहेत. या विभागात वेळ घेणारे घेणारे प्रश्न असतील. हा विभाग एकूण २० गुणांचा असेल.
विभाग (ई): पेपरच्या शेवटच्या विभागात ३ प्रश्न असतील. यामध्ये केस स्टडी प्रश्न असतील. या विभागात प्रत्येक प्रश्नासाठी ४ गुण दिले दिलेले आहेत. हा विभाग १२ गुणांचा असेल


