Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एमपीएससीच्या परीक्षार्थीवर अपात्रतेची तलवार, ठोस निर्णय न घेतल्याने विद्यार्थी अडचणीत; वयोमर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा

एमपीएससीच्या परीक्षार्थीवर अपात्रतेची तलवार, ठोस निर्णय न घेतल्याने विद्यार्थी अडचणीत; वयोमर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा

पुणे: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शासनाने वयवाढ केलेली नसून केवळ २०२४ च्या कम्बाईनच्या एका जाहिरातीसाठी विशेष संधी दिलेली आहे. आगामी होणाऱ्या राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेपासून राज्यातील लाखो परीक्षार्थी अपात्र ठरले आहेत. राज्य शासनाने छत्तीसगड राज्यासह इतर आठ राज्यांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी वयोमर्यादा वाढवावी, अशी आग्रही मागणी राज्य शासनाला होत आहे. वयोमर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा राज्य शासनाला इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

छत्तीसगड राज्य शासनाने सन २०२८ पर्यंत वयोमर्यादेत वाढ केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढ किमान ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत करण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाने ३ मार्च २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ असा शासननिर्णय जाहीर केला; परंतु या शासननिर्णयाचा फायदा प्रत्यक्षात जेमतेमू ९ ते १० महिनेच मिळाला. या कालावधीत एकही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. २०२४ ची कम्बाईन गट ब व गट क जाहिरात तब्बल आठ ते नऊ महिने उशिरा आली. याला जबाबदार विद्यार्थी नसून शासन आहे. २०२४ च्या कम्बाईन जाहिरातीसाठीच केवळ विशेष संधी दिली असून राज्य शासनाने वय वाढीसाठी ठोस कोणतेच निर्णय घेतले नसल्याने विद्यार्थी अडचणीत आहेत.

या शासननिर्णयामध्ये सरसकट दोन वर्षे वयोमर्यादा वाढ म्हणजे २४ महिने असा उल्लेख होतो. सध्या संपूर्ण लाभ म्हणजेच २४ महिने मिळालाच नाही. तो प्रत्यक्षात १० महिनेच लाभ मिळाला आहे. संपूर्ण २४ महिने म्हणजे खरे तर शासनस्तरावरूनच हा शासननिर्णय ३ मार्च २०२३ ते २ मार्च २०२५ असा असायला हवा होता, तरच खऱ्या अर्थाने दोन वर्षे वयवाढ मिळू शकली असती. त्यामुळे शासन स्तरावरून २०२३ चा जीआर उशिरा लागू झाला. ३१ डिसेंबर २०२३ ला या वयवाढ जीआरची मुदत संपून गेली आहे. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२३ च्या शासननिर्णयानुसार, ३१ डिसेंबर २०२७ अशी वयोमयादित वाढ करावी, जेणेकरून सरसकट विद्यार्थाना न्याय मिळेल.

कोरोनामुळे इतर आठ राज्यांनी वयोमर्यादेत वाढ करून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्याने संधी दिली आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांनी नेमकी दाद मागायची तरी कुठे? असा सवाल विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विद्यार्थ्यांना न्याय देऊन ३१ डिसेंबर २०२७ इतकी वयोमर्यादेत वाढ करावी, जेणेकरून सरसकट विद्यार्थ्यांना न्याय मिळून त्यांचे भावी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!