Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! बँकेत नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण; ‘इथं’ निघाली भरती…

Bank Job ! बँकेत नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण; ‘इथं’ निघाली भरती…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय निर्यात-आयात बँक येथे काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय निर्यात-आयात बँक येथे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स ग्रुप आणि अधिकारी-पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

२१ सप्टेंबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.eximbankindia.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : अधिकारी – कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स ग्रुप आणि अधिकारी – पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन

– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ०१ सप्टेंबर २०२५.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२५.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!