पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीडमध्ये जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : बीड
– वयोमर्यादा : 62 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जानेवारी २०२६.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि., मुख्य कार्यालय, राजुरी वेस, बीड-431122
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://beed.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


