पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सातारा येथील वन विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सातारा येथील वन विभागात वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैद्यकीय पथक कामी प्राणी रक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सहा रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखत, परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी परिसर, सातारा ४१५००१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैद्यकीय पथक कामी प्राणी रक्षक
– रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सातारा
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 13,500/- ते रु. 60,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2026.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी परिसर, सातारा ४१५००१.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : forest.satara68@gmail.com


