मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगणच्या सुपरहिट सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम’ च्या तिसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता निर्मात्यांनी अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम ३’ ची अधिकृत घोषणा केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या १ मिनिट १३ सेकंदाच्या टीझर व्हिडिओमध्ये अजय देवगणचा आवाज ऐकू येतो, ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबाच्या महत्त्वाबद्दल बोलतो. दृश्यम मालिकेच्या आतापर्यंतच्या कथेची झलक या टीझरमध्ये दिली आहे. त्यात विजय साळगावकर (अजय देवगण) म्हणतो, ‘मेरा सच मेरा सही सिर्फ मेरी फैमिली है’ हे टीझर देखील अधोरेखित करतो.
तसेच व्हिडिओच्या शेवटी, विजय साळगावकर अर्थात अजय देवगण म्हणतो, “जब तक सब थक नहीं जाते, जब तक सब हार नहीं जाते, मैं यहीं खड़ा हूं चौकीदार बनकर. एक दीवार बनकर कहानी अभी खत्म नहीं हुई है. आखिरी हिस्सा अभी बाकी है”, असे म्हटले आहे.
‘दृश्यम ३’ कधी रिलीज होणार?
निर्मात्यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीला चित्रपट प्रदर्शित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ‘दृश्यम’ पाहिला असेल, तर २ ऑक्टोबर रोजी काय घडले ते तुम्हाला कळेल. या योजनेचा भाग म्हणून निर्मात्यांनी ही तारीख निश्चित केली आहे. ‘दृश्यम ३’चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे.


