पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वर्धा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ०२ फेब्रुवारी २०२६ मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://wardha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : वर्धा.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०२ फेब्रुवारी २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सकांचे कार्यालय, सामान्य रुग्णालय, वर्धा, जिल्हा वर्धा ४४२००१.


