Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! दापोलीतील ‘या’ प्रसिद्ध विद्यापीठात नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक…

Job News ! दापोलीतील ‘या’ प्रसिद्ध विद्यापीठात नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक…

पुणे : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १ डिसेंबर २०२५ ही अर्ज करण्याची तारीख असणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे अध्यापन सहयोगी (भाजीपाला विज्ञान/ फ्लोरिकल्चर आणि लँडस्केप बागकाम/ फळ विज्ञान), अध्यापन सहयोगी (माती विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सिंधुदुर्ग येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.dbskkv.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : अध्यापन सहयोगी (भाजीपाला विज्ञान/ फ्लोरिकल्चर आणि लँडस्केप बागकाम/ फळ विज्ञान), अध्यापन सहयोगी (माती विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र).

– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुळदे, जिल्हा. सिंधुदुर्ग

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (पोस्टाने/कुरिअरने/हस्ते).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ डिसेंबर २०२५.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : असोसिएट डीन, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, मुळदे, ता. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग, पिन ४१६ ५२०.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!