पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात IDBI येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
IDBI येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 1 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस/एमडी
– वयोमर्यादा : ६७ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक, मानव संसाधन – भरती, आयडीबीआय बँक, आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://idbibank.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


