पुणे : पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 12 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे येथे प्रकल्प सहयोगी-II, सल्लागार यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-II, सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : venkateswara@iiserpune.ac.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.iiserpune.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


