Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या घरात आनंदी-आनंद; चिमुकल्याच्या आगमनाने शुभेच्छांचा वर्षावच

कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या घरात आनंदी-आनंद; चिमुकल्याच्या आगमनाने शुभेच्छांचा वर्षावच

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण, कतरिनाने एका मुलाला जन्म दिला आहे. या कपलने सोशल मीडियावर चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. विकी कौशल आणि कतरिनाची पोस्ट लगेचच व्हायरल झाली आणि चाहते आणि सेलिब्रिटींनी दोघांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी आधीच या बाळाला ‘ज्युनियर विकी कौशल’ म्हणायला सुरुवात केली आहे.

परिणीती चोप्रा, बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा, कियारा अडवाणी आणि करीना कपूरसह अनेक चित्रपट कलाकारांनी विकी कौशल आणि कतरिना कैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यात करिनाच्या कमेंटने सर्वांची मने जिंकली. करिना कपूरने दोघांचे अभिनंदन करताना लिहिले, “कुटुंबात स्वागत आहे, कॅट बॉय, मॉम.” मी तुझ्या आणि विकीसाठी खूप आनंदी आहे.” नुकतेच एका मुलाचे स्वागत करणाऱ्या परिणीती चोप्राने लिहिले, “नवीन आई आणि बाबांचे अभिनंदन.” प्रियांका चोप्राने लिहिले, “खूप आनंद झाला. खूप खूप अभिनंदन.”

राकुल प्रीत सिंग, मलायका आणि अर्जुन यांनीही अभिनंदन केले. अर्जुन कपूर, मलायका अरोरा, रकुल प्रीत सिंग आणि नीती मोहन यांनीही कतरिना आणि विकी यांचे अभिनंदन केले, त्यांच्या नवजात बाळाचे स्वागतही केले. चाहत्यांनीही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. एका चाहत्याने कमेंट केली, ‘वेलकम ज्युनियर विकी.’ सध्या याचीच चर्चा सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!