पुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ४ नोव्हेंबर, २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे डीन रिसर्च, रिसर्च मॅनेजर, असिस्टंट प्रोफेसर (रिसर्च), रिसर्च असोसिएट, फार्माकोलॉजिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्टॅटिस्टिशियन यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोफेसर डिजिटल हेल्थ, स्किल लॅब टेक्निशियन, वरिष्ठ अभियंता (प्रकल्प), स्टोअर मॅनेजर, ऑफिसर इन चार्ज – सिम्युलेशन लॅब.
– एकूण रिक्त पदे : 14 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ४ नोव्हेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : hr.chakra@muhs.ac.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


