Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bigg Boss : 61 वर्षीय कुनिका ‘बिग बॉस’च्या घरात; अभिषेक बजाजच्या असभ्य वागण्यावर चांगलीच संतापली

Bigg Boss : 61 वर्षीय कुनिका ‘बिग बॉस’च्या घरात; अभिषेक बजाजच्या असभ्य वागण्यावर चांगलीच संतापली

मुंबई : बिग बॉस १९ या रिअॅलिटी शोमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. ९ आठवड्यांनंतर, सर्व स्पर्धकांचे कार्ड उघड झाले आहेत. गेल्या भागात कुनिका सदानंद आणि अभिषेक बजाज पुन्हा एकदा भिडल्याचे पाहिला मिळाले. ‘वीकेंड का वार’ या टास्कदरम्यान, अभिषेकने कुनिकाला डायन म्हटले. या कमेंटमुळे कुनिका खूप नाराज झाली. तेव्हापासून ती अभिषेकविरुद्ध बोलत आहे.

अभिषेक आणि अशनूर कौर यांनी त्यांचे मायक्रोफोन बंद करून बोलल्याने घरात गोंधळ उडाला. त्यांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण घराला मिळाल्याने अनेकांची नाराजी समोर आली. तिच्याशिवाय सर्वांना नॉमिनेट करण्यात आले आणि घराच्या राशनमध्येही ५० टक्के कपात करण्यात आली. तेव्हापासून, कुनिकाचा अभिषेकवरील राग आणखी तीव्र झाला. ती शोमध्ये अभिषेक आणि त्याच्या टीमला चिडवताना आणि त्यांच्याबद्दल टिप्पण्या करताना दिसली. अभिषेकने कुनिकाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिनेत्री चिडली. तिने कुनिकाला आजी आणि आंटी असे म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला.

कुनिका आणि अभिषेक यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे पाहिला मिळाले. त्यादरम्यान कुनिकाने अभिषेकला कोर्टात खेचण्याची धमकी दिली. अभिषेकने गौरव आणि घरातील इतर सदस्यांना सांगितले की, कुनिका त्याला धमकावत आहे, त्याला कोर्टात खेचण्याबद्दल बोलत आहे. त्यानंतर घरातील सदस्यांनी अभिनेत्याला शांत राहण्याचा सल्ला देत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!