Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! वित्त विभाग महाराष्ट्र येथे नोकरीची संधी; कुठंही जायची नाही गरज, घरबसल्या करता येणार अर्ज…

Job Alert ! वित्त विभाग महाराष्ट्र येथे नोकरीची संधी; कुठंही जायची नाही गरज, घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, वित्त विभाग महाराष्ट्र येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी (उपसंचालक आणि लेखा अधिकारी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत चार रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. jdreformsdat.mum-mh@mah.gov.in या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahakosh.maharashtra.gov.in/  या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी (उपसंचालक आणि लेखा अधिकारी).

– एकूण रिक्त पदे : 04 पदे.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 09 मे 2026.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2026.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : संगणक कक्ष, लेखा व कोषागारे संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई-३२.

– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : jdreformsdat.mum-mh@mah.gov.in

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!