पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पण, महाराष्ट्रात १३५ पदांवर भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण ७५० रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी.
– रिक्त पदे : ७५० पदे (महाराष्ट्रात १३५ पदे).
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
– वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pnbindia.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


