पुणे : मध्य रेल्वे विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मध्य रेल्वे नागपूर मंडळ येथे निवृत्त अधिकारी पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : निवृत्त अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 22 ऑगस्ट 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मध्य रेल्वे नागपूर, कार्मिक विभागात, आस्था कक्षात ठेवलेला बॉक्स.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


