Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हाला सारखं अशक्तपणा जाणवतोय? तर आहारात दररोज करा ‘या’ फळांचा समावेश, होईल फायदा…

तुम्हाला सारखं अशक्तपणा जाणवतोय? तर आहारात दररोज करा ‘या’ फळांचा समावेश, होईल फायदा…

अनेकदा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. पण, काहीवेळा काहीना काहीतरी समस्याही उद्भवत असते. त्यात शरीरातील कमजोरी अर्थात अशक्तपणा सहसा वयानुसार येतो. मात्र, आजकाल ही समस्या तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये देखील दिसून येत आहे. तुम्हीही अशा लोकांपैकी आहात, ज्यांना सतत अशक्तपणाचा सामना करावा लागतो? तर तुम्ही काही उपाय करून हा अशक्तपणा दूर करू शकता.

तुम्ही तुमच्या आहारात शरीराला ऊर्जा देणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि खनिजे यांसारखे पोषक घटक असतात. तुम्ही दररोज वेगवेगळ्या दिवशी हिरव्या पालेभाज्या, फळे, लाल-पिवळ्या-हिरव्या सिमला मिरची, गाजर, वांगी, बीट, सर्व प्रकारच्या डाळी आणि संपूर्ण धान्य यासारख्या रंगीबेरंगी भाज्या खाव्यात. तुम्ही सुकामेवा आणि बिया देखील खाव्यात.

केळी खाणेही फायद्याचे ठरू शकते. केळी हे जवळजवळ प्रत्येक ऋतूत उपलब्ध असलेले फळ आहे. ते पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्सचे उत्कृष्ट स्रोत आहेत. केळी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात आणि स्नायूंच्या कामात देखील मदत करतात. तसेच सफरचंद हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, जे शरीराला अनेक फायदे देते हे सर्वांनाच माहिती आहे.

सफरचंदात असतात अनेक गुणकारी घटक

सफरचंदात भरपूर जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमचे पोट, पचन, हृदय, वजन आणि त्वचेचे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यात भरपूर मॅग्नेशियम असते, जे तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!