मुंबई : सुपरस्टार राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटात काम केलं. पण, सध्या ते हयात नाहीत. त्यांच्या जाण्यानंतर आजही त्यांची आठवण कायम आहे. त्यात राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांचे नाते अनेकांना परिचित असेल. अनिता अडवाणी राजेश खन्ना यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये राजेश खन्ना आणि त्यांच्या नात्याबाबत माहिती दिली.
अनिता अडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत गुप्तपणे लग्न केले होते, असा खुलासा त्यांनी केला. दोघेही सुमारे 12 वर्षे एकत्र होते. अनिताने एका पॉडकास्टमध्ये राजेश खन्नासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. अनिता यांना विचारण्यात आले की, राजेश खन्ना यांचे कुटुंब प्रतिष्ठित असूनही त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून पाठिंबा का मिळत नव्हता? त्यावर अनिता यांनी म्हटले की, डिंपल कपाडिया १९८२ मध्ये त्यांना सोडून गेल्या. ३० वर्षांपासून त्यांच्यात कोणताही संबंध नव्हता. राजेश खन्ना मध्येच अडकले होते. त्यांचा घटस्फोटही होत नव्हता. म्हणूनच ते अडकले. घटस्फोट झाला नाही आणि गोष्टीही सुटल्या नाहीत.
अनिता पुढे म्हणाल्या, मी वर्षोनुवर्षे राजेश खन्नासोबत राहत होते. तरीही मला काहीही मिळाले नाही. सगळं काही अशा प्रकारे झालं की सगळं काही नियंत्रणाबाहेर गेलं. अगदी गोष्टीही राजेश खन्ना यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. अखेर कुटुंबाला त्यांची सर्व मालमत्ता मिळाली. ही स्वतःच एक मोठी कहाणी आहे. तेव्हापासून या कायदेशीर लढाईत अडकले आहे. हा मालमत्तेचा वाद अजूनही उच्च न्यायालयात सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.


