Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया यंदा वेळेवर सुरू; प्रथमच जून-जुलैमध्ये विद्यार्थी होणार निश्चित

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया यंदा वेळेवर सुरू; प्रथमच जून-जुलैमध्ये विद्यार्थी होणार निश्चित

कोल्हापूर : खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मोफत प्रवेश सुविधा देणारी आरटीईची प्रवेश प्रक्रिया यंदा १८ डिसेंबरला शाळा नोंदणीपासून सुरू झाली. जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल, तर मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यांत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे नियमित वेळेत आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ ठेवले जाऊ शकतील.

बालकांचा मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेषकरून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव जातात. या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग, तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाते. यासंदर्भात शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया सुरू व्हायलाच फेब्रुवारी-मार्च उजडायचा. यावेळी मात्र मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून-जुलै महिन्यांतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!