Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर हादरलं! पुलाखाली आढळला गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह

इंदापूर हादरलं! पुलाखाली आढळला गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह

Indapur Murder Case: इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात एक भीषण प्रकार उघडकीस आला आहे. गावातील पुलाखाली पाण्यात गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून, ती सुमारे सहा ते सात महिन्यांची गर्भवती होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, तिच्या डाव्या हातावर ‘रविराज’ असा टॅटू आढळल्याने तपासाला महत्त्वाचा धागा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घटनास्थळी भिगवण पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांचा अंदाज आहे की, महिलेचा मृत्यू सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा. प्राथमिक तपासात हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांचा विश्वास आहे की महिलेची इतरत्र हत्या करून मृतदेह पुलाखाली फेकण्यात आला असावा.

हेही वाचा – दारूसाठी दोन मुलांनी आईला संपवलं! खलबत्त्याने डोक ठेचून केली निर्घृण हत्या

या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी जवळील सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आणि मोबाईल लोकेशन डेटा तपासण्यास सुरुवात केली आहे. सध्या महिलेची ओळख पटवणे हेच पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. भिगवण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, या प्रकरणाबाबत काही माहिती असल्यास पुढे येऊन ती पोलिसांना द्यावी. तपास जलदगतीने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व शक्य दिशा तपासल्या जात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!