Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: वर्दी मिळवण्याची जिद्द अपूर्ण! पुण्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: वर्दी मिळवण्याची जिद्द अपूर्ण! पुण्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडली आहे. सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय विरू काळे याने पोलीस भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आलेला असताना मित्राच्या खोलीवर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

नेमकी घटना काय?
सातारा जिल्ह्यातील सैदापूर (ता. जि. सातारा) येथील रहिवासी असलेला विरू संजय काळे हा तरुण पोलीस भरतीसाठी पुण्यात आला होता. शिक्रापूर येथील मित्र रणजीत साळुंखे आणि आदित्य साळेकर यांच्यासोबत तो गेल्या दोन दिवसांपासून एका खोलीवर वास्तव्यास होता. सर्व मित्र मिळून परीक्षेची तयारी करत होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास मित्रांची नजर चुकवून विरूने खोलीत दोरीने गळफास घेतला.

हेही वाचा – Pune Cycling Tour Accident: पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळून जखमी

पोलीस कारवाई आणि तपास
विरूला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. हवालदार बापू हाडगळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. विरूने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्यावर काही मानसिक दडपण होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!