Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Congress MLA Arrested: पीडितेचा मुख्यमंत्र्यांना मेसेज अन् काँग्रेस आमदाराची थेट तुरुंगात रवानगी…’त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

Congress MLA Arrested: पीडितेचा मुख्यमंत्र्यांना मेसेज अन् काँग्रेस आमदाराची थेट तुरुंगात रवानगी…’त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

Congress MLA Arrested: लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल मामकुटातिल (३६) यांना पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री नाट्यमयरीत्या अटक केली. एकापाठोपाठ एक अशा तीन महिलांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने आरोपी आमदाराची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश 

या प्रकरणाला वेग आला तो एका ३१ वर्षीय पीडित महिलेच्या व्हॉईस मेसेजमुळे. सध्या परदेशात असलेल्या या महिलेने थेट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना संदेश पाठवून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचेही तिने या मेसेजमध्ये नमूद केले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ अटकेचे आदेश दिले.

अटकेचा थरार आणि तपास

शनिवारी रात्री १२:३० च्या सुमारास पालक्कडमधील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून राहुल यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान राहुल यांनी आपला फोन अनलॉक करण्यास सहकार्य नाकारले, त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांचा फोन जप्त केला आहे. आरोपीची शारीरिक तपासणी आणि डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

हेही वाचा – Sangli Crime: सांगली हादरली! ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; दोन आरोपींना अटक

काय आहे नेमकी घटना?

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२४ रोजी तिरुवल्ला येथील एका हॉटेलमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आला होता. आमदार पदाचा गैरवापर करून महिलांचे शोषण केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, राहुल यांच्यावर अशाच प्रकारचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. ‘आम्ही आधीच राहुल मामकुटातिल यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्या वैयक्तिक कृत्यांशी आता काँग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही,’ असं काँग्रेस नेते के. मुरलीधरन यांनी म्हटलं आहे.

न्यायालयाचा कडक पवित्रा

राहुल मामकुटातिल हे राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्ती असल्याने ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा पीडितेला धमकावू शकतात, हा गुन्हे शाखेचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. या पार्श्वभूमीवर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असून या कारवाईमुळे केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!