Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sangli Crime: सांगली हादरली! ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; दोन आरोपींना अटक

Sangli Crime: सांगली हादरली! ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; दोन आरोपींना अटक

Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे घडलेल्या एका गंभीर घटनेने परिसर हादरून गेला आहे. अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या आईने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे (रा. खांबे मळा, कामेरी रस्ता, ईश्वरपूर) यांच्याविरोधात अपहरण, बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – Maval Rape and Murder Case: मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; पोलिसांची शोधमोहीम सुरू

आई कामावरून घरी परतल्यानंतर तिला मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली. काही वेळातच पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे ठाण्यात आणले. त्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यावर प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट झाले. घटनेनंतर पीडित मुलगी मदतीच्या शोधात शहराच्या दिशेने आली. शहराच्या जवळील एका चौकात नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तात्काळ मदत केली, आवश्यक कपडे दिले आणि पोलिसांना कळवले. नागरिकांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा – Beed Crime : कलाकेंद्रात कामाचे आमिष दाखवून बारामतीच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका चार जणांवर गुन्हा दाखल

या घटनेमुळे ईश्वरपूर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!