नवी दिल्ली : सध्या अनेक वेब ब्राउजर लाँच करण्यात आले आहेत. त्यात OpenAI ने AI-संचालित वेब ब्राउझर ChatGPAT Atlas लाँच केला. या वेब ब्राउझरने बाजारात प्रवेश केल्यापासून Google साठी समस्या निर्माण केल्या आहेत. कंपनीने या आठवड्यात ChatGPAT Atlas लाँच केले आहे.
दुसऱ्या दिवशी, गुगलच्या मूळ कंपनीचा स्टॉक घसरला, ज्यामुळे कंपनीचे बाजार मूल्य $१५० अब्ज (अंदाजे १३.१८८ अब्ज रुपये) कमी झाले. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे वेब ब्राउझर लाँच केला. यावेळी, ऑल्टमन म्हणाले, हा एक दुर्मिळ क्षण आहे जेव्हा आपल्याला ब्राउझर काय-काय करू शकतात याचा विचार करण्याची संधी मिळते. OpenAI च्या AI ब्राउझरच्या लाँचचे बाजारात तात्काळ परिणाम दिसून आले.
ब्राउझर लाँच झाल्यानंतर मंगळवारी एका तासात अल्फाबेटचे शेअर्स ४.८ टक्क्यांनी घसरले. शेवटच्या टप्प्यात कंपनीचे शेअर्स २.४ टक्क्यांनी घसरून $२५०.४६ वर आले. शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य लक्षणीयरीत्या कमी झाले. गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेट, याचे मार्केट कॅप ३.०५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.


