नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर १६.४५ टक्क्यांनी वाढून १५.८२ लाख कोटी रुपयापेक्षा जास्त झाले आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते १७ डिसेंबरपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन १५.८२ लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत आगाऊ कर संकलनात २१ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आणि ते ७.५६ लाख कोटी रुपये झाले. एकूण कर संकलनामध्ये ७.४२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट कर संकलन आणि ७.९७ लाख कोटी रुपये बिगर-कॉर्पोरेट कर संकलनाचा समावेश आहे. आढावा कालावधीत ४०,११४ कोटी रुपयांचा रोखे व्यवहार कर संकलन झाले आहे.
या कालावधीत ३.३९ लाख कोटी रुपयांचा कर परतावा जारी करण्यात असून तो वार्षिक आधारावर ४२.४९ टक्क्यांनी जास्त आहे. एकुण प्रत्यक्ष कर संकलन १९.२१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे एका वर्षांपूर्वीच्या संकलनापेक्षा २०.३२ टक्क्यांनी जास्त आहे.


