Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कर वाढल्यास देशात इलेक्ट्रिक वाहनांचा मार्ग खडतर; किया इंडियाने केली चिंता व्यक्त

कर वाढल्यास देशात इलेक्ट्रिक वाहनांचा मार्ग खडतर; किया इंडियाने केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांवर कर वाढल्यास भारतीय वाहन उद्योगातील ई-वाहनांचा वाढीचा प्रवास खंडात होईल, अशी चिंता किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकजरी अधिकारी गुआंगू ली यांनी नवीन एसयूव्ही ‘सिरॉस’चे अनावरणप्रसंगी बोलताना केली.

सध्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांवर ५ टक्के दराने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. तथापि, जुन्या ईव्हीवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील संभाव्य कर वाढीच्या परिणामाबद्दल विचारले असता ली म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांच्या उच्च किमती अजूनही एक मोठा भार आहेत. त्यामुळे सरकारकडून कोणत्याही कर सवलतीशिवाय इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरवणे फार कठीण आहे, असे ते म्हणाले. किया इंडियाला या वर्षी २.५५ लाख वाहनांच्या तुलनेत सुमारे तीन लाख वाहनांची वार्षिक विक्री अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील सोनेट नंतर सिराँस ही नवीन एसयूव्ही कंपनीने बाजारात दाखल केली आहे. कंपनीने त्याची किंमत जाहीर केलेली नाही; परंतु इच्छुक ग्राहक ३ जानेवारीपासून ते बुक करू शकतात. ग्राहकांना सिरॉसचे वितरण फेब्रुवारीपासून सुरू होईल.

एसयूव्हीमध्ये सिराँसकडून विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि मिड-एसयूव्ही प्रकारातील बाजारपेठेतील हिस्सा पुढील वर्षी १५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. आरामदायी आणि सुरक्षित प्रवास आणि भविष्यातील तंत्रज्ञान या संकल्पनेवर हे नवीन मॉडेल विकसित करण्यात आल्याचे किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) हरदीप सिंग ब्रार यांनी सांगितले. सुरक्षित प्रवासासाठी सिरॉसमध्ये एडीएएस २.० तंत्रज्ञान आणि एअरबॅगसह इतर महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!