मुंबई : शेअर मार्केटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडमोडी घडत आहे. त्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविणारे अब्जाधीश अलख पांडे यांच्या मालकीची एडटेक कंपनी, Physicswallah चा IPO उघडण्यास तयार झाला आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमचे पैसे तयार ठेवा. हा IPO ११ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे.
कंपनीने किंमत रेंज आणि लॉट आकाराची माहिती उघड केली आहे. सामान्य गुंतवणूकदारांना मंगळवारी (दि.११) सुरू होणाऱ्या Physicswallah IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल आणि गुंतवणूकदारांना १३ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस असतील. एकूण इश्यू आकार ३४८० कोटी आहे, ज्यामध्ये फ्रेश आणि ऑफर-फॉर-सेल (OFS) द्वारे स्टॉक ऑफरिंगचा समावेश आहे. कंपनी ३१०० कोटी किमतीचे नवीन शेअर्स जारी करेल, तर ३८० कोटी किमतीचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकले जातील.
फिजिक्सवाला आयपीओसाठी किंमत बँड १०३ ते १०९ प्रति शेअर आहे. कर्मचाऱ्यांना वरच्या किंमत बँडमध्ये प्रति शेअर १० रुपयांची सूट देखील मिळेल. आयपीओचा ७५% क्यूआयबींना, १०% किरकोळ गुंतवणूकदारांना आणि उर्वरित भाग इतर श्रेणींना वाटप केला जातो.


