Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एलॉन मस्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती; संपत्तीचा आकडा पाहूण डोक चकरावेल

एलॉन मस्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती; संपत्तीचा आकडा पाहूण डोक चकरावेल

Elon Musk : टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. हा विक्रम करणारे ते पहिलेच उद्योगपती आहेत. गेल्या १० वर्षांत मस्कची संपत्ती ३४ पट वाढली आहे. टेस्लाचा शेअर गेल्या एका वर्षात ७८% वाढला आहे. टेस्लाचे भांडवली मूल्य सुमारे १.४४ ट्रिलियन डॉलर (१२७ लाख कोटी रुपये) आहे आणि शेअरची किंमत ४५९.४६ डॉलर आहे. गेल्या एका वर्षात टेस्लाच्या शेअरने ७८% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यांत कंपनीचा शेअर ६२% वाढला आहे. भारतात टेस्लाचे दोन शोरूम मुंबई आणि दिल्लीमध्ये आहेत.

फोर्ब्स रिअल टाइम बिलियनेअर्स यादीनुसार, मस्क यांची निव्वळ संपत्ती ५०० अब्ज डॉलर (४४.३३ लाख कोटी रुपये) झाली होती. टेस्लाच्या शेअरमध्ये ३.३१% वाढ झाल्याने मस्कच्या निव्वळ संपत्तीत वाढ दिसून आली.

मस्क यांनी १२ व्या वर्षी व्हिडीओ गेम बनवून विकले होते. सध्या ते टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मस्क यांनी १० व्या वर्षी संगणक प्रोग्रामिंग शिकून घेतले. १२ व्या वर्षी ‘ब्लास्टर’ नावाचा व्हिडीओ गेम तयार केला. जो स्थानिक मॅगझिनने त्यांच्याकडून ५०० अमेरिकी डॉलरमध्ये खरेदी केला.

एलॉन मस्क यांचा इतिहास

१९९५ मध्ये त्यांनी वेब सॉफ्टवेअर कंपनी ‘झिप२’ स्थापन केली. कॉम्पॅकने १९९९ मध्ये ही कंपनी ३०७ दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केली. या व्यवहारामुळे मस्कला कंपनीत ७% हिस्सा देऊन २२ दशलक्ष डॉलर मिळाले. त्यानंतर मस्कच्या व्यवसायाची खरी सुरुवात झाली. मस्कने १९९९ मध्ये पेपल तयार केली. ईबेने २००२ मध्ये पेपल १.५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली. या डीलमुळे मस्कला १८० दशलक्ष डॉलर मिळाले. तत्काळ नंतर मस्कने ‘स्पेसएक्स’ची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून मस्क मंगळ ग्रहावर कॉलनी बसवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!