मुंबई: मुंबई, नागपूर, पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी १४३.५७ किमी लांबीचे मेट्रो मार्ग सुरु करण्यात आले आहेत. याचा फायदा दररोज १० लाख प्रवासी घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईत ४१.२ किमी आणि पुण्यात २३.२ किमी असे ६४.४ किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. पुढील ५ वर्षांत राज्यात २३७.५ किमी लांबीचे मेट्रो मार्ग सुरु करण्यात येणार आहेत.
नागपूर शहरातील मेट्रोचा ४० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ६७०८ कोटी किमतीच्या ४३.८० किमी लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग आणि पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पुणे मेट्रो टप्पा २ अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी, नळस्टॉप, वारजे आणि माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९८९७ कोटी किमतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे


