Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आता थांबायचं नाय’ च्या चित्रीकरणाला सुरुवात

‘आता थांबायचं नाय’ च्या चित्रीकरणाला सुरुवात

महाराष्ट्र जागरण डेस्क: आशियामधील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या भारतातील मानाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘आता थांबायचं नाय’ हा ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.

पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार यांचे औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी मुंबई नगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, महापालिका उपायुक्त किरण दिघावकर, झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर, निर्माते निधी परमार हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यांसंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरणार असल्याची खात्री निर्मात्यांना आहे. मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं, ही गोष्ट ‘झी स्टुडिओज’ साठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे, असे झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल यांनी म्हटले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!