Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Akshaye Khanna: ‘छावा’ पाठोपाठ अक्षय खन्नाच्या वाट्याला आणखी एक मोठा चित्रपट; असुरगुरू ‘शुक्राचार्य’ च्या भूमीकेत तेलुगू चित्रपटात झळकणार

Akshaye Khanna: ‘छावा’ पाठोपाठ अक्षय खन्नाच्या वाट्याला आणखी एक मोठा चित्रपट; असुरगुरू ‘शुक्राचार्य’ च्या भूमीकेत तेलुगू चित्रपटात झळकणार

Akshaye Khanna : अक्षय खन्ना बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकारांमध्ये ओळखला जातो. त्याने आतापर्यंत मोजके सुपरहिट चित्रपट दिले आहेत. याच ताकदीच्या बळावर अक्षयनं विकी कौशललाही तोडीस तोड देईल अशी ‘औरंगजेब’ची भूमिका ‘छावा’ चित्रपटात साकारली. आता त्याला प्रशांत वर्मा आणि आरकेडी स्टुडिओच्या वतीनं मोठ्या चित्रपटाची ऑफर आली आहे.

‘छावा’ चित्रपटात अक्षयनं उभा केलेला क्रूर मुघल शासक पाहताना प्रत्यक्षात औरंगजेब किती क्रूर असेल याचीच सिनेरसिकांना प्रचिती आली आणि काहींनी या भूमिकेला प्रत्यक्ष समजून अक्षय खन्नाप्रती तिरस्काराच्याही प्रतिक्रिया दिल्या. ही खरंतर त्याच्या कामाचीच पोचपावती ठरली. याच अभिनेत्याच्या वाट्याला आता आणखी एक आव्हानात्मक आणि तितक्याच ताकदीची भूमिका आली आहे.

‘असुरगुरू शुक्राचार्य’
अक्षय खन्नाच्या वाट्याला आलेली ही भूमिका आहे असुरगुरू शुक्राचार्य यांची आहे. प्रशांत वर्मा आणि आरकेडी स्टुडिओच्या वतीनं नुकताच ‘असुरगुरू शुक्राचार्य’ रुपातील अक्षय खन्नाची पहिली झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे. आगामी महाकाली या चित्रपटातून तो या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

शुक्राचार्यांची प्रतिमा आतापर्यंत ज्याप्रमाणं कथा- पुराणांच्या माध्यमातून समोर आली आहे अगदी त्याचप्रमाणं अक्षयचं रुप या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. लांब, करडी दाढी, भाळी भस्माचा टिळा, रोखलेली भेदक नदर, चेहऱ्यावर धीरगंभीर भाव अशा ऋषीरुपातील अक्षय खन्ना पाहताना त्याची संपूर्ण भूमिका पाहणं कुतूहलाचं असेल अशीच प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली. तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याच्या या प्रयत्नाला आता किती प्रेक्षक.पसंती मिळते हे पाहणं औत्सुक्यांचं ठरेल. तुम्हाला कसा वाटला या अभिनेत्याचा नवा लूक?


अक्षय खन्नाची नवी भूमिका काय आहे?
अक्षय खन्ना ‘महाकाली’ या आगामी तेलुगू चित्रपटात ‘असुरगुरू शुक्राचार्य’ ही भूमिका साकारत आहे. ही भूमिका असुरांची गुरू असलेल्या शुक्राचार्याची आहे. जी पौराणिक कथांमध्ये दानवांचे मार्गदर्शक म्हणून ओळखली जाते. हा चित्रपट देवी कालीवर केंद्रित असून, स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सादर केला जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!