Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कांतारा द चॅप्टर वन: 125 कोटींच्या बजेटमध्ये प्रेक्षकांना मिळणार रोमांचक अनुभव

कांतारा द चॅप्टर वन: 125 कोटींच्या बजेटमध्ये प्रेक्षकांना मिळणार रोमांचक अनुभव

‘कांतारा द चाप्टर वन’ या सिनेमाचा ट्रेलर सध्या सगळीकडे प्रचंड धुमाकुळ घालतोय. जो तो कांतारा विषयी बोलतोय. पण हा कांतारा आधीच्या कांतारा पेक्षा वेगळा कसा? त्यांची स्टोरी काय आहे? त्यात कोणकोणते कलाकार आहेत? त्यांच्या भूमिका काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थिएटरमध्ये जाणून पाहावं इतका वर्थइट हा सिनेमा आहे का? या आणि अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

कांताराने म्हणजे आधीच्या कांतारा या सिनेमाने 15 ते 16 कोटींच्या बजेटमध्ये 400 कोटींचा गल्ला जमवला होता. तसं बघायला गेलं तर पठाण असेल किंवा मग पुष्पा असेल हे सगळे सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते पण ते आवडण्यामागचं कारण त्याला लावलेलं बीग बजेटही होतं. मात्र कांताराच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती. या सिनेमासाठी फक्त 16 कोटी लावले आणि 400 कोटी कमावले. पुढे हीच गोष्ट कांतारा या सिनेमाला इतर सिनेमांपेक्षा वेगळी ठरवत होती. मात्र आताचा कांतारा द चाप्टर वन हा प्रिक्वल जो आला त्यानं मात्र लो बजेटचा मुद्दाच मुळापासून खोडून काढलाय. याचं कारण म्हणजे ‘कांतारा द चाप्टर वन’ने 100 कोटींचं बजेट क्राॅस केलं आहे. त्यामुळे कन्नड सिनेमांमध्ये बनलेला हा मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिनेमा ठरु शकतो ज्याचं बजेट KGF चा सिक्वेल KGF 2 पेक्षाही जास्त आहे. म्हणजे साधारण 125 कोटींच्या आसपास आहे. आता यातून दोन गोष्टी क्लिअर होतात. एक म्हणजे कांतारा द चाप्टर वन या सिनेमात खरंच असं काही तरी असू शकतं ज्यासाठी शंभर कोटी सुद्धा कमी पडतील. किंवा मग इतर सिनेमांप्रमाणे पैसे कमावण्याचं लालच याही सिनेमामध्ये आलं असावं.

हेही वाचा – पाण्याचा कॅन विकणाऱ्या ऋषभ शेट्टीला चित्रपटांमध्ये संधी मिळाली कशी? एक चित्रपट ज्याने बदलून टाकलं जीवन

प्रेझेंटेशन स्टाईल, युनिक काॅनसेप्ट, कल्चरल व्हॅल्यू, डिव्होशनल व्हॅल्यू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लायमॅक्स नंतरची रिशभ शेट्टीची अॅक्टींग या सगळ्यानेच कांताराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. कांतारामध्ये जंगल vs राजा अशी स्टोरी पाहायला मिळाली. ज्यात कशापद्धतीने त्या जंगलाला स्वत:ची प्रायव्हेट प्राॅपर्टी समजून ते हडपलं जातं यावर तो सगळा मुव्ही आधारीत होता. शिवाय ऋषभ शेट्टीचं कॅरॅक्टर या सगळ्याच्या मध्ये होतं. त्याचे वडिल त्याच्या लहानपणी त्या जंगलात अचानक गायब झालेले असतात. यानंतर आता कांदारा द चाप्टर वन हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलिज होतोय. विशेष म्हणजे रिलिजच्या आधीच या सिनेमासाठी वापरलेलं 125 कोटींचं बजेर रिकव्हर सुद्धा झालंय. रिपोर्टनुसार अमॅझाॅन प्राईमने आधीच या सिनेमाचे सगळ्या भाषांमधील राईट्स विकत घेतलेत. त्यामुळे यानंतर जी काही कमाई होईल ते वेगळीच असणारेय. काहींच्या मते हा सिनेमा आरामात 500 कोटींचा गल्ला जमा करु शकतो. याचं कारण म्हणजे, परसी जाक्सन, the boys, aqua man, the nun, mufasa, क्रेव्हर हंटर यांसारख्या मुव्हीचं VFX चं काम करणाऱ्या MPC कंपनीनं यात व्हिज्यूव्हल इफेक्टचं काम केलंय. त्यामुळे हा सिनेमा व्हिज्यूव्हल डिसपाॅइंट करेन याची तीळमात्र शक्यता नाही.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ‘कांतारा ‘फेम ऋषभ शेट्टी

साधारण तीन मिनिटांचा ट्रेलर आहे. कांतारा हा सिनेमा जिथे सोडला तिथूनच हा सिनेमा सुरु होतो. त्याच स्पाॅटवर ऋषभ शेट्टी म्हणजे शीवा येतो आपले वडिल नेमके कुठे गायब झाले याचा शोध घेतो. त्याला एक स्टोरी सांगितली जाते ती स्टोरी म्हणजे आताचा कांतारा द चाप्टर वन. यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत.. एक स्वत: कांतारा जंगल आणि दुसरं राजाचा दरबार. दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण ट्रेलरमध्ये काही शाॅट्स एकदम खतरनाक आहेत. यात मग राजाचा दरबार असेल किंवा मग वाघ आणि त्या लहान बाळाचा शाॅट, वाघाचा समोरुन घेतलेला शाॅट, हजारो उंतरांचा शाॅट, जळत असलेली एका देवाची प्रतीमा, त्यानंतर रिषभ शेट्टीचा तो लास्ट शाॅट सगळं काही एकदम तगडं आहे. बाकी ट्रेलरवरुन एवढं नक्की लक्षात येतंय की स्टोरी ही पहिल्या पार्टमधल्या शीवाच्या लहानपणापासून सुरु होते. जिथे त्याला सांगितलं जातं की, का त्याचे वडिल कांताराच्या जंगलात गायब झाले होते. मुळात कांतारा या शब्दाचा अर्थच एक रहस्यमय जंगल असं असतं. त्यामुळे आत्ताच्या सिनेमात या जंगलाला कांतारा असं का म्हणतात याचं उत्तर मिळणार आहे. यानंतर डिटेलिंगचा व्यवस्थित अभ्यास केला.

उदा- ट्रेलरच्या बरोबर 15 सेकंदवर पाॅज केलं तर तिथे राजाच्या दरबारात सुर्य आणि चंद्राची आकृती दिसेल जी सेम कांतारामध्ये सुद्धा दिसलं होतं. त्यानंतर तो एक दगड ज्यावर त्रुशूल बनवलाय तो दगडही या पार्टमध्ये दाखवलाय. दुसरी गोष्ट म्हणजे या कांतारा द चाप्टर वनमध्ये मसाल्यांचा पण काही तरी गौडबंगाल दिसू शकतो. कारण ट्रेलरच्या एका मिनिटावर पाॅज करुन जर पाहिलं तर त्याच्या खिश्यातून वेलची सांडताना दिसते. त्यानंतर 1 मिनिट 10 सेकंदवर राजा आपल्या हातात काळी मिरी घेतो. 2 सेकंदानंतर बाजारात हळकुंड आणि इतर मसाल्यांचं सामान विकलं जात आहे. आता हे सगळं तिथल्या राजाचा व्यापार असावा जे कांतारामधील लोक इल्लिगल करत असावेत. याच्याही पुढे जाऊन रिषभ शेट्टीचं कॅराक्टर जेव्हा राजकुमारीच्या प्रेमात पडतं तेव्हा सिनेमात खरी मजा येते.

कारण तिथला स्थानिक राजा याच्या विरोधात असतो त्यामुळे सहाजिकत तिथं जोराचं युद्ध होतं. पुढे परत एकदा ऋषभ शेट्टी एक वेगळं रुप धारण करतो. बाकी कांतारामध्ये जो DOP होता सेम तोच DOP इथेही आहे. ट्रेवर वरुन कलर ग्रिडिंग कमाल दिसतंय. मेकअप, काॅश्च्यूम, साऊंड क्वालीटी, इडिटिंग सगळं काही एकदम भन्नाट आहे. हा शेवटी जाता जाता एक बोनस पाॅईंट तो म्हणजे या सिनेमाचं नाव कांतारा द चाप्टर वन असं आहे. त्यामुळे याचा चाप्टर टू सुद्धा येऊ शकतो जो शेवटी जमिनीच्या खालचा शाॅट आहे तिथून किंवा युद्धातील विजयानंतरही सुरु होऊ शकतो. त्यामुळे २ ऑक्टोबरची वाट पाहावी लागले. बाकी हा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
अष्टपैलू

अष्टपैलू

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!