मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान हे आता चर्चेत आहेत. संजय कपूर यांच्या ३०००० कोटींच्या वैयक्तिक मालमत्तेत वाटा मागितल्यामुळे या दोघांची सध्या चर्चा सुरु आहे. दोघेही दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. असे असताना संजय कपूर यांच्या वाढदिवशी करिश्मा आणि तिची बहीण करिना कपूर यांनी त्यांची आठवण काढली. यामध्ये ते भावनिक झाले.
करिश्मा कपूरचे एक्स पती दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांची जयंती १५ ऑक्टोबर रोजी होती. जर संजय कपूर जिवंत असते तर त्यांनी त्यांचा ५४ वा वाढदिवस साजरा केला असता. हा दिवस संजय कपूर यांच्या कुटुंबासाठी विशेषतः त्यांच्या मुलांसाठी खूप भावनिक होता. याप्रसंगी उद्योगपती संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांनी त्यांची आठवण काढली. अभिनेत्री करिश्मा कपूर तिची मुले, समायरा आणि कियान आणि बहीण करीना कपूर यांनीही संजय कपूरच्या आठवणीत केक कापला.
करिश्माची मुले समायरा आणि कियान संजय कपूर यांच्या ३०००० कोटी (अंदाजे $१.५ अब्ज) वैयक्तिक मालमत्तेत वाटा मागितल्यामुळे चर्चेत आहेत. ते दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. जून २०२५ मध्ये संजय कपूर यांचे निधन झाले. मुलांनी न्यायालयात दावा केला आहे की, संजयची पत्नी प्रिया सचदेव हिने कथितपणे त्यांचे मृत्युपत्र बनावट केले आहे. आता हा खटला अजूनही चालू आहे.


