मुंबई : बॉलिवूडमधील अनेक स्टार्सविषयी अनेकांना माहितीही नसेल. पण, काही स्टार्स असे आहेत ते पहिल्यापासून प्रसिद्धी झोतात होते. त्यात 2016 मध्ये, तुषार कपूर सरोगसीद्वारे त्याचा मुलगा लक्ष्य याचा बाप झाला. आता, तुषार कपूरने याबाबत भाष्य केले. त्याने हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे वडील सुपरस्टार जितेंद्र यांना माहिती दिली नव्हती.
बॉलिवूड जगात असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना एकट्याने वाढवले आहे. तुषार कपूर अशा स्टार्सपैकी एक आहे. अभिनेता विवाहित नाही, परंतु तो एका मुलाचा पिता आहे. तुषारने सिंगल फादर होण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल उघडपणे सांगितले. तो म्हणाला, “मी खूप जुन्या पद्धतीचा आहे. मी माझ्या वडिलांसारखा आहे, पण आम्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहोत. पाच वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर, मी स्वतःच्या मर्जीने जगायला शिकलो. मी लग्न केलेलेही नाही. मी एकटाच राहतो. पण माझे वडील तसे नाहीत. ते लग्न आणि कुटुंबावर विश्वास ठेवतात.
लग्नाबद्दल बोलताना तुषारने स्पष्ट केले की, तो लग्नाचा आदर करतो, पण ते प्रत्येकासाठी नाही. त्याला एकटाच राहण्यापूर्वी त्याच्या पालकांची परवानगी घेण्याची गरज वाटत नव्हती. मी लग्नावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, पण ते माझ्यासाठी नव्हते. मला वडील व्हायचे होते. माझ्या पालकांकडून कोणताही दबाव नव्हता. कारण मी त्यांना विचारले नव्हते. मी ३९ वर्षांचा होतो.


