मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची एक्स पत्नी आणि अभिनेत्री धनश्री वर्मा सध्या ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये चर्चेत आहे. या शोमध्ये धनश्रीने अनेक गोष्टींवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यात धनश्री अनेकदा युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाबद्दल बोलताना दिसते. तुटलेल्या लग्नामुळे धनश्री इतकी दुःखी आहे की तिला पुन्हा सेटल व्हायचे नाही. घटस्फोटानंतर धनश्री वर्मा आता पुन्हा लग्न करणार नसल्याचे समोर आले आहे.
१५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये धनश्री वर्मा नयनदीप रक्षित आणि पवन सिंगसोबत तिच्या सुंदर स्वप्नाबद्दल बोलताना दिसली. धनश्री म्हणते की, ‘मला खूप चांगले स्वप्न पडले. मी पाहिले की मी मोहरीच्या शेतात उभी आहे आणि खूप आनंदी आहे. ते खूप सुंदर दृश्य होते. यावर नयनदीप म्हणतो की, तू एकटी आहेस की तुझ्यासोबत कोणीतरी होते. ती म्हणते की ‘मी एकटी होते. आता मला कोणाचीही गरज नाही. मी एकटीच आनंदी आहे. मी नातेसंबंधांमध्ये खूप त्रास सहन केला आहे’.
तसेच, मला वाटते की मी इंडस्ट्रीची महिला सलमान खान आहे. मी लग्न करणार नाही. आता मी आयुष्यभर अविवाहित राहीन. यावर बोलण्यापासून पवन सिंह रोखू शकला नाही. ‘हे सांगणे खूप सोपे आहे, पण तसे होत नाही. आयुष्यात एखाद्याची गरज असते’ असे म्हणून त्यानंतर तो तिथून उठतो आणि निघून जातो.


