मुंबई : जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांचा बहुप्रतिक्षित ‘होमबाउंड’ मूव्हीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात धुमाकूळ घातला आहे. आता, भारतीय चाहते तो थिएटर्समध्ये पाहू शकतील. हा मूव्ही शुक्रवारी रिलीज झाला. नीरज घायवान दिग्दर्शित या मूव्हीत भारतात रिलीज होण्यापूर्वी काही बदल करण्यात आले आहेत.
सीबीएफसीने ११ बदल केले आहेत, ज्यामध्ये ७७ सेकंदांचे फुटेज कमी करणे आणि सामन्याचा क्रम ३२ सेकंदांपर्यंत कमी करणे समाविष्ट आहे. सेन्सॉर बोर्डाच्या तपासणी समितीने होमबाउंडबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर एका सुधार समितीने चित्रपटाची समीक्षा केली. त्यांनी जान्हवीच्या चित्रपटात ११ बदल करण्याची शिफारस केली आणि त्याला यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले. या मूव्हीमध्ये क्रिकेट सामन्याचा एक महत्त्वाचा भाग दाखवण्यात आला आहे.
सेन्सॉर बोर्डाने हा भागही कमी केला आहे. ३२ सेकंदांचा संवाद आणि दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. शिवाय, सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १६ सेकंदांचा भाग आणि २० सेकंदांचा शॉट ए़डिट करण्यात आला आहे. २ सेकंदांचा संवाद म्यूट करण्यात आला आहे. या सर्व बदलांनंतर, चित्रपटाचा अंतिम रनटाइम १२२ मिनिटे (२ तास, २ मिनिटे) आहे.


