Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘या’ अभिनेत्याने 17 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केलं लग्न; कुटुंबाचा विरोध असतानाच…

‘या’ अभिनेत्याने 17 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केलं लग्न; कुटुंबाचा विरोध असतानाच…

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात अभिनेता मनीष चौधरी याचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. कारण, आर्यन खानच्या ‘द बॅडीज ऑफ बॉलीवूड’या मालिकेत मनिष चौधरी दिसला. मनीषने फ्रेडी सोडावाला या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मनीष २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

एका मुलाखतीत मनीष आणि त्याची पत्नी श्रुती मिश्रा यांनी त्यांच्या अपारंपरिक प्रेमकथेबद्दल सांगितले. त्यांच्यात १७ वर्षांचा वयाचा फरक आहे. मनीषला वयाचा फरक म्हणून काही वाटलं नाही. मात्र, श्रुतीला तिच्या पालकांना त्यांच्या नात्याबद्दल पटवून देण्यासाठी दोन वर्षे लागली. या जोडप्याने २०२३ मध्ये लग्न केले. श्रुतीने मनीषसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. त्यांची एका थिएटरमध्ये भेट झाली. मुंबईत माझ्यासारख्याच लहरी असलेल्या व्यक्तीला सापडल्याने मला खूप आनंद झाला, असे श्रुतीने सांगितले.

सुरुवातीपासूनच मी अनेकदा ‘आय लव्ह यू’ म्हणायचे. मनीषला ते सांगण्यासाठी मला थोडा वेळ लागला. वयाच्या फरकाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली, ‘आमच्यात १७ वर्षांचा फरक आहे. मला वाटतं जेव्हा मी त्याला विचारलं, ‘तुमचं वय किती आहे?’ मला माहित होतं की वयाचा फरक आहे, पण मला माहित नव्हतं की किती. मनीष म्हणाला, ‘वयाचा मला कधीच त्रास झाला नाही. मात्र, आम्हाला आमच्या कुटुंबियांना तयार करण्यासाठी दोन वर्षे लागली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!