Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पाकिस्तानी सेलिब्रिटी रामशा खानने केले गुपचूप लग्न; लग्नाचे फोटो झाले लीक अन् नंतर…

पाकिस्तानी सेलिब्रिटी रामशा खानने केले गुपचूप लग्न; लग्नाचे फोटो झाले लीक अन् नंतर…

इस्लामाबाद : सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर असल्याचे पाहिला मिळते. त्यात जे सेलिब्रिटी सतत कॅमेऱ्यासमोर असतात, ते आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यास प्राधान्य देतात. ते आपल्या आयुष्यातील माहिती इतर लोकांसमोर उघड करण्यास कचरतात. यामुळेच अनेक शोबिझ स्टार्स आता गुपचूप लग्न करून संसार थाटत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री रमशा खान.

रमशा खानने गुपचूप लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड वर्तुळात तिच्या गुप्त लग्नाची चर्चा सुरू आहे. अनेक वृत्तांनुसार, रमशाने तिचा प्रियकर आणि अभिनेता खुशाल खानसोबत गुपचूप लग्न केले आहे. दोघांनाही आपले नाते खाजगी ठेवायचे होते, त्यामुळे त्यांनी लग्नाची घोषणा केली नाही. लग्नाच्या अफवांदरम्यान, अभिनेत्री रमशा खान आणि खुशाल खानच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी रमशा आणि खुशालचे अभिनंदन केले, तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.

लग्नाच्या फोटोंमध्ये रमशा खान सलवार सूटमध्ये दिसली. मात्र, तिने डोक्यावर हिरव्या रंगाचा बनारसी स्कार्फही घातला होता. तिने मांगटिका आणि कमीत कमी दागिन्यांनी आपला लूक पूर्ण केला. तिने गळ्यात फुलांचा हारही घातला होता, तर तिचा वर, राजा, पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!