Today सोमवार, 2nd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bigg Boss 19 मध्ये टायगर श्रॉफसह सोनम बाजवा करणार एंट्री; निमित्तही आहे तसंच…

Bigg Boss 19 मध्ये टायगर श्रॉफसह सोनम बाजवा करणार एंट्री; निमित्तही आहे तसंच…

मुंबई : सध्या ‘बिग बॉस १९’ चा पहिला ‘वीकेंड का वार’ लवकरच येत आहे. शोच्या पहिल्या आठवड्यात बरेच काही घडले आहे. या चार दिवसांत बेडरूमपासून ते जेवणापर्यंत अनेक भांडणे, वाद-विवाद झाली आहेत. घराबाहेर पडणे आणि सिक्रेट ट्विस्ट देखील आले आहेत. असे असताना या सीझनमध्ये टायगर श्रॉफसह सोनम बाजवा करणार एंट्री करणार आहेत.

‘बागी ४’ फिल्मच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक खास प्लॅन तयार केला आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला ३१ ऑगस्टला त्यांच्या बागी ४ या चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल पद्धतीने रिलीज करणार आहेत. पण त्याआधीच या चित्रपटाचा ट्रेलर बिग बॉस १९ मध्ये दाखवला जाईल. त्यामुळे आता ‘वीकेंड का वार’ भाग पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. सलमान खानच्या बिग बॉस १९ या शोमध्ये टायगर श्रॉफ, हरनाज संधू आणि सोनम बाजवा दिसणार आहेत. म्हणजेच, ट्रेलर डिजिटल रिलीज होण्यापूर्वी तो शनिवारी सलमान खानच्या उपस्थितीत शोमध्ये प्रदर्शित होईल.

सलमान आणि टायगरला पडद्यावर एकत्र पाहणे देखील चाहत्यांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे. टायगरच्या अ‍ॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या चित्रपटाचा टीझर लोकांना खूप आवडला. बागी फ्रँचायझीच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!