Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thalapathy Vijay Retirement: 33 वर्षांच्या सोनेरी प्रवासाचा शेवट! सुपरस्टार थलापती विजयचा अभिनयाला रामराम

Thalapathy Vijay Retirement: 33 वर्षांच्या सोनेरी प्रवासाचा शेवट! सुपरस्टार थलापती विजयचा अभिनयाला रामराम

Thalapathy Vijay Retirement: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापती विजय याने अभिनयातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर विजयने सिनेसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला असून, या बातमीने जगभरातील त्याचे करोडो चाहते भावूक झाले आहेत. २७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियामध्ये पार पडलेल्या आपल्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच सोहळ्यात त्याने हा मोठा निर्णय जाहीर केला.

‘जन नायकन’ असणार शेवटचा चित्रपट

विजयचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ (Jana Nayakan) हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ठरेल. ९ जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक एच. विनोद यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विजयसोबत बॉबी देओल, पूजा हेगडे आणि प्रियामणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

हेही वाचा- ‘दृश्यम 3’ चे निर्माते अक्षय खन्नाला पाठवणार कायदेशीर नोटीस; कारण नेमकं काय?

निवृत्तीची घोषणा करताना ५१ वर्षीय विजय अत्यंत भावूक झाला होता. तो म्हणाला, “मी चित्रपटसृष्टीत एक छोटासा वाळूचा किल्ला बांधण्याच्या आशेने आलो होतो, पण माझ्या चाहत्यांनी मला राजवाडा दिला. गेली ३३ वर्षे तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले आणि माझ्या कठीण काळात जी सोबत दिली, त्याचे आभार मानण्यासाठी आता मला तुमच्यासाठी उभे राहायचे आहे. हा विजय तुमची कृतज्ञता परत करण्यासाठी राजकारणाच्या मैदानात उतरत आहे.” थलापती विजयने गेल्या वर्षी ‘तमिलगा वेत्री कझगम’ (TVK) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आता त्याने आपला पूर्ण वेळ जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेसृष्टीतील निवृत्तीनंतर तो आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!