मुंबई : सध्या अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. ‘धुरंधर’मुळे अक्षय खन्नाला चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे. मात्र, आता त्याची अडचण वाढण्याची शक्यता आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर अनप्रोफेशनल असल्याचा आरोप केला आहे. तसेच अक्षय खन्ना चित्रपटातून अचानक बाहेर गेल्याने आता त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत आहेत.
निर्माते कुमार मंगत यांनी सांगितले की, दीर्घ चर्चा आणि औपचारिक करारानंतर अक्षयला चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते. मात्र, नियोजित शूटिंगच्या दहा दिवस आधी अक्षय खन्ना प्रोजेक्ट सोडून गेला. अक्षयने सुरुवातीला काही कारणांमुळे विग न घालण्याचे मान्य केले होते. मात्र, नंतर त्याच्या सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्याने आपला विचार बदलला. अक्षय खन्नासोबत करार केला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याचे मानधनही निश्चित करण्यात आले. पण नंतर काही कारणास्तव यातील चर्चा फिस्कटली. तेव्हा अभिषेक पाठक (दिग्दर्शक) यांनी त्याला समजावून सांगितले.
निर्मात्याने अक्षयच्या कारकिर्दीवरही भाष्य केले. सेक्शन ३७५ (२०१९) आणि दृश्यम २ (२०२२) आधी अक्षय खन्ना काम शोधण्यासाठी संघर्ष करत होता. एक काळ असा होता जेव्हा अक्षय खन्ना काहीच नव्हता. तेव्हा मी त्याच्यासोबत सेक्शन ३७५ (२०१९) ची निर्मिती केली. पण, नंतर चित्रपटातून अचानक बाहेर गेल्याने आता त्याला कायदेशीर नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.


