मुंबई : सध्या ‘बिग बॉस’ या शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच शुक्रवारच्या एपिसोडने बिग बॉसच्या घरात एक नवीन ट्विस्ट आणला. आजारपणामुळे बाहेर असलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे शोमध्ये परतला आहे. तान्या आणि फरहाना वगळता घरातले सर्वजण त्याला पाहून खूप आनंदी झाले. गौरव खन्ना आणि मृदुल आपल्या मित्राला परत पाहून खूप आनंदी झाले.
प्रणित मोरेला पुन्हा शोमध्ये आलेले पाहून सर्वात आनंदी दिसली ती म्हणजे क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती. प्रणित मोरे गेल्यानंतर घरातील वातावरण खूपच बदलले होते. मालती चहर खूप दुःखी झाली होती. ती कॉमेडियन प्रणितला मित्र मानू लागली होती. प्रणित घरात नसतानाही ती त्याच्याशी बोलायची. प्रणित घरात असल्याने त्याचे वातावरण आनंदाचे बनले होते. आता तो परत आल्यानंतर मालती देखील भावूक झाली. मालतीने प्रणितला मिठी मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरूनच सोशल मीडियावर नवीन जोडीची चर्चा सुरु झाली.
मालती आणि प्रणितचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकटे बसून बोलत आहेत. मालती आणि प्रणित एकत्र जेवत आहेत आणि मालती प्रणितला सांगते की, तो गेल्यावर तिला त्याची खूप आठवण येत होती. पण आता तो परत आला आहे, मालतीला अजूनही त्याची आठवण येते. त्यामुळे यामध्ये नवीन जोडी तयार झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.


