Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

थंडीत तुम्ही तुमच्या लहान मुलांची काळजी घ्याच; बाहेर जाणं टाळा अन् ‘या’ गोष्टी मात्र नक्की करा…

थंडीत तुम्ही तुमच्या लहान मुलांची काळजी घ्याच; बाहेर जाणं टाळा अन् ‘या’ गोष्टी मात्र नक्की करा…

सध्या वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनते. प्रौढांवर उपचार करणे सोपे असते. मात्र, लहान मुलांची काळजी काय घ्यावी हे अनेकांना समजत नाही. पण आता थंडीत लहान मुलांची काळजी घेताना बाहेर जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा.

डिसेंबर महिन्यात तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना, गरम पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. लहान मुलांची काळजी घेणे हे एक आव्हान बनत आहे. पण, काही गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात लहान मुलांना कोमट पाणी प्यायला सांगणे, गरम-उबदार कपडे घालावेत. गरम दूध, हळद आणि सुंठ मिक्स करून दिल्यास फायद्याचे ठरू शकते. असे केल्यास थंडीमुळे होणारा खोकला सर्दी, पडसे याचे प्रमाण कमी होऊ शकते. बाहेरचं खाणं टाळावे. पिझ्झा, कुल्फी, बर्गर थंड पदार्थ टाळावे. पालकांनी याची काळजी घ्यावी.

थंडीचे दिवस साधारणत: दोन ते तीन महिन्यांपर्यंत असतात. त्यामुळे या दिवसांत लहान मुलांची काळजी घेणे आव्हानात्मक बनते. दूध, दही, केळी, संत्री, मोसंबी, पेरू टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच फळे जर द्यायचेच झाले तर चिकू, अंजिर यांसारखी फळे देता येऊ शकतात. मात्र, ही फळे शक्यतो दुपारच्या वेळेत देण्याचा प्रयत्न करावा. कारण, सकाळी किंवा रात्री दिली तर कफ वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.

नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी?

पहिले सहा महिने मातेच्या दुधावर बाळ अवलंबून असते. त्यामुळे या दिवसांत मातेने विशेष काळजी घ्यावी. जर मातेला काही आजार असेल तर तिने काळजी घेणे गरजेचे आहे. थेट हवेचा संपर्क टाळावा. गार पाणी पिणे टाळावे. आहार हा पोषक असेल, याची खात्री करावी.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!