Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जळगावनंतर हिंगोलीतही महायुतीत फूट? शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी दिला ‘स्वबळा’चा नारा!

जळगावनंतर हिंगोलीतही महायुतीत फूट? शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी दिला ‘स्वबळा’चा नारा!

हिंगोली: महाराष्ट्रात महायुतीच्या राजकारणात ताण-तणाव वाढत असताना, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार संतोष बांगर यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले की, हिंगोलीत आम्ही स्वबळावर उमेदवार उभे करू. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी तयारीला सुरुवात झाली असल्याचंही बांगर यांनी स्पष्ट केलं.

बांगर यांनी स्पष्ट केले की, जिथे युती शक्य आहे, तिथे आम्ही सहकार्याचा विचार करू. पण जिथे मतभेद आहेत, तिथे आमचा पक्ष स्वतंत्रपणे लढेल. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी सांगितले की, कोणावरही वैयक्तिक टीका न करता आपल्या कामाच्या बळावर मतदारांचा विश्वास जिंकावा. आपली ताकद दाखवायची असेल तर विकासकामांमधून दाखवा, असे आवाहन यावेळी संतोष बांगर यांनी केलं आहे.

हेही वाचा – ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार; संजय राऊत यांची मोठी घोषणा

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा–भडगाव मतदारसंघात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती आधीच विस्कटली आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर लढणार अशी घोषणा केली, तर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला. या हालचालींमुळे महायुतीत अंतर्गत मतभेद उघड होत असून, आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!