Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात ST बस उलटली; 10 प्रवासी जखमी

मोठी बातमी! नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात ST बस उलटली; 10 प्रवासी जखमी

ST Bus Overturned: नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी चंदनपुरी घाटाजवळ एक गंभीर अपघात घडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. या घटनेत सुमारे दहा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर घाटातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.

प्राथमिक माहितीनुसार, बस संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी घाटातून पुण्याकडे जात असताना एका तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने बस उतारावरून खाली कोसळली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि महामार्गावरील गस्ती पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. उलटलेली बस रस्त्याच्या कडेला हलवण्याचे काम तातडीने करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत राहिली.

हेही वाचा – Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलचा खळबजनक दावा; म्हणाली, रिक्षाचालकाच्या कुटुंबाने 19 लाख रुपये मागितले

दरम्यान, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले. नंतर रस्ता पूर्णपणे मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. चंदनपुरी घाट हा नाशिक-पुणे मार्गावरील सर्वात जोखमीचा टप्पा मानला जातो आणि येथे यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!