Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ! मानवी रक्षणासाठी बिबट्यांची नसबंदी; 50 बिबटे वनतारामध्ये पाठवणार- अजित पवार

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ! मानवी रक्षणासाठी बिबट्यांची नसबंदी; 50 बिबटे वनतारामध्ये पाठवणार- अजित पवार

पुणे: विधानभवनात दिशा कृषी उन्नती या विषयावर आयोजित बैठकीत अजित पवार यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. ज्यात ऊस शेती आणि मानवी वस्त्यांमधील बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्यामुळे बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्याबरोबरच त्यांची नसबंदी करण्याची सूचना केल्या गेल्यात. त्यानुसार 125 बिबटे पकडण्यात येणार असून, त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे.

जिल्ह्यातील चार तालुक्यांत बिबट्यांची संख्या वाढली असून, वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला आता वेगळे वळण लागले आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासंदर्भात माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी अजित पवार यांना बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही बैठक झाल्याचे पवार यांनी सांगितले.

याशिवाय, जिल्ह्यात व्यवस्थित वीजपुरवठ्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. त्याशिवाय बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून साहित्य खरेदीसाठी चाळीस कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच गुजरात राज्यातील वनतारा प्रकल्पांतर्गत सुमारे पन्नास बिबटे पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!