Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dattatray Bharne: जालन्यात शेतकऱ्यांचा रोष; बांधावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषीमंत्री भरणे यांच्यावर केला प्रश्नांचा भडीमार

Dattatray Bharne: जालन्यात शेतकऱ्यांचा रोष; बांधावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषीमंत्री भरणे यांच्यावर केला प्रश्नांचा भडीमार

Dattatray Bharne: राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बुधवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड संतापाला सामोरे जावे लागले. गेवराई गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत थेट मंत्र्यांना भिडले. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दांत प्रश्न उपस्थित केले.

शेतकऱ्यांनी भरणे यांना शेतात उभे राहून पाण्यात भिजलेली व कुजलेली पिके दाखवली. इतकेच नव्हे तर काहींनी ही पिके हातात देऊन परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली. जिल्हाधिकाऱ्यांनी फळबागांचे पंचनामे करू नका, असा आदेश दिला आहे. तुमची यंत्रणा आम्हाला विचारायलासुद्धा येत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे एक क्षण भरणे यांना तेथून तातडीने निघावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत वातावरण शांत केले.

हेही वाचा – महा उद्रेक…! सीना नदीला पूर, पुणे-सोलापूर महामार्ग बंद; लाखो हेक्टर शेती उद्ध्वस्त, राज्यातील सध्याची स्थिती काय?

एका तरुण शेतकऱ्याने संताप व्यक्त करताना सांगितले, ’15 दिवस झाले, सगळीकडे पाणीच आहे. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून आम्हाला काहीही मिळालं नाही.’ शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर कृषीमंत्री भरणे संतापले. त्यांनी पंचनाम्यात झालेल्या त्रुटींवर अधिकाऱ्यांना फटकारले. ‘ज्याचं नुकसान झालं त्याचा प्रत्येक गुंठा नोंदवला गेला पाहिजे. कुठेही पंचनामा राहिला तर जबाबदार अधिकारीच असतील. शेतकरी वंचित राहणार नाहीत, ही जबाबदारी माझी आहे,’ असा विश्वासही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला.

कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं की, ‘मी येथे आलो, कारण, तुमच्या संपूर्ण तालुक्यातील यंत्रणा कामाला लागेल. राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे, पण कोणताही शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही. घरांचे पडझड, गुरांचे बळी, विहिरींचे नुकसान सगळ्यांचा समावेश पंचनाम्यात केला जाईल. ऑगस्ट-सप्टेंबरमधील नुकसानीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,’ असं आश्वासनही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!