Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ 6.85 टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ 6.85 टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी असून, २५ जुलै २०२५ ही शेवटची तारीख आहे. बिहारमध्ये एकूण मतदार (२४ जून २०२५ पर्यंत) ७,८९,६९,८४४ असून आतापर्यंत ६,९९,९२,९२६ (८८.६५%) फॉर्म सादर झाले आहेत. यापैकी ६,४७,२४,३०० (८१.९६%) अपलोड झालेले आहे.

यात पत्त्यावर सापडले नाहीत असे मतदार ३५,६९,४३५ (४.५%) मतदार असून मृत समजले गेलेले १२,५५,६२० (१.५९%) मतदार तर कायमचे स्थलांतर झालेले १७,३७,३३६ (२.२%) मतदार आहेत. अनेक ठिकाणी नाव नोंदलेले ५,७६,४७९ (०.७३%) मतदार आहे. मतदार म्हणून नोंदणीसाठी ५४,०७,४८३ (६.८५%) शिल्लक फॉर्म आहेत.

विशेष मोहिमा आणि देण्यात येणाऱ्या सुविधा अंतर्गत, २६१ नगरपरिषदांतील सर्व ५,६८३ प्रभागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. तसेच इतर राज्यात असलेले बिहारचे नागरिक देखील मोबाईलवरून ECINet App किंवा https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म भरू शकतात. भरलेले फॉर्म थेट BLO (Booth Level Officer) कडे किंवा कुटुंबियांमार्फत WhatsApp/इतर माध्यमांनीही पाठवता येतील.

दुहेरी नावनोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती स्थानिक राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याद्वारे नियुक्त १.५ लाख बूथ एजंट्स यांच्यासोबत उद्यापासून शेअर केली जाणार आहे. यामुळे २५ जुलैपूर्वी खात्री करता येईल की, केवळ पात्र मतदारांचीच नावनोंदणी झाली आहे.

“प्रत्येक पात्र मतदाराची नोंद व्हावी, हे सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. उरलेल्या ६.८५% मतदारांनी त्वरित फॉर्म भरावा.” असे आवाहनही भारत निवडणूक आयोगाने केले आहे.

अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असेही भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!