तूप केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः ओठांच्या काळजीसाठी, तुपापासून बनवलेला लिप बाम हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे, जो ओठांना खोलवर मॉइश्चराइझ करतो आणि त्यांना मऊ व गुलाबी बनवण्यास मदत करतो. जर तुम्हाला तुमचे ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी बनवायचे असतील, तर घरगुती तुपाचा लिप बाम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.
लिप बाम घरी बनवण्यासाठी ४ मोठे चमचे तूप, २ मोठे चमचे खोबरेल तेल, १ मोठा चमचा मध, सुगंधी तेलाचे काही थेंब (जसे की पेपरमिंट किंवा लॅव्हेंडर तेल) या साहित्याची गरज लागणार आहे. सर्वप्रथम, एका लहान पातेल्यात तूप आणि खोबरेल तेल एकत्र करून मंद आचेवर वितळवा आणि थंड होऊ द्या.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात मध घालून चांगले मिसळा. शेवटी, तुमच्या आवडीचे इसेन्शियल ऑइल घालून चांगले ढवळून घ्या. हे मिश्रण एका लहान डब्यात किंवा लिप बामच्या ट्यूबमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. तुमचा नैसर्गिक लिप बाम काही तासांत तयार होईल.
या गोष्टी लक्षात ठेवा :
– पहिल्यांदा वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
– लिप बाम नेहमी स्वच्छ डब्यात आणि थंड, कोरड्या जागी ठेवा. तो फ्रीजमध्ये ठेवणे उत्तम.


