Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुमच्या बागेला नवीन लूक देऊ शकतात ‘ही’ फुलं; बागेसह घराचं सौंदर्य येईल चांगलं खुलून

तुमच्या बागेला नवीन लूक देऊ शकतात ‘ही’ फुलं; बागेसह घराचं सौंदर्य येईल चांगलं खुलून

प्रत्येकाला आपलं घर स्वच्छ, सुंदर असावं असं वाटतं असतं. घराचे सौंदर्य वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर झाडे आणि रोपे लावणे. यामुळे एक नवीनच लूक मिळतो आणि घराची हवाही ताजी होते. जेव्हा तुमच्या घरात, बागेत किंवा बाल्कनीत सुंदर फुले उमलतात तेव्हा एक सकारात्मक वातावरण येते. बहुतेक लोक त्यांच्या बागेत अशी रोपे लावतात जी सकाळी फुलतात आणि दिवसभर सुंदर दिसतात.

चंद्रफूल ज्याला इपोमोआ अल्बा असेही म्हटले जाते. कोणत्याही चंद्र बागेसाठी चंद्रफूल सर्वात महत्वाचे आहे. संध्याकाळ होताच त्याची मोठी, पांढरी फुले उमलतात. त्याचा गोड सुगंध तुम्हाला आराम देऊ शकतो. हे एक वेलीचे फूल आहे जे लवकर वाढते. दिवसा ते उन्हात फुलते, परंतु रात्री त्याचे सौंदर्य आणखी वाढवते. कंदफुलही चांगले फायद्याचे ठरते. हे फुल त्याच्या लांब देठ आणि पांढऱ्या फुलांनी बागेचे सौंदर्य वाढवते. रात्री त्याचा सुगंध आणखी वाढतो. हे फूल कोणत्याही बागेला रोमँटिक बनवू शकते. तुम्ही ते तुमच्या बाल्कनीत देखील लावू शकता.

ओनोथेरा बिएनिस ही अशी फुलं जी हलक्या पिवळ्या रंगाची असतात. संध्याकाळ होताच ही फुले फुलू लागतात. ही फुले चांदण्यामध्ये आणखी चमकतात. याची खास गोष्ट म्हणजे त्यांना जास्त पाणी देण्याचीही गरज नाही. यांसारखी फुलं तुम्ही तुमच्या घरातील बाल्कनी असो वा बाग यामध्ये ती लावल्यास एक वेगळाच अनुभव तुम्हाला येऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!